ओरिजनल पक्ष कोण हे निवडणूक आयोगच ठरवणार, सुप्रीम कोर्टात कुणाचा युक्तिवाद?
विधीमंडळात अपात्र झाले असले तरी पक्षाचं सदस्यत्व रद्द करण्याच अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे ओरिजनल पक्ष कोणता, हे आम्ही ठरवू, असा युक्तिवाद अॅड. अरविंद दातार यांनी केला.
सुनिल काळे, नवी दिल्लीः खरी शिवसेना (Shivsena) कुणाची, पक्षचिन्ह कुणाचं यावरून सुप्रीम कोर्टात (Supreme court) आज विविध वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शपथविधी वैध आहे की अवैध हे ठरवण्यासाठी आधी विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग आणि राज्यपालांचे अधिकार स्पष्ट होणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद दुपारच्या सत्रात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनीही यावेळी युक्तिवाद केला. खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगच ठरवणार, असा युक्तिवाद त्यांनी केला. यासाठी त्यांनी आर्किटल 324 चा दाखलाही दिला. विधीमंडळात अपात्र झाले असले तरी पक्षाचं सदस्यत्व रद्द करण्याच अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे ओरिजनल पक्ष कोणता, हे आम्ही ठरवू, असा युक्तिवाद अॅड. अरविंद दातार यांनी केला.