राष्टवादीच्या काही आमदारांची दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र, जयंत पाटील म्हणाले…
२०१४ ला काही लोकांनी टोल बंद करू म्हणून निवडणुक लढली होती. पण, टोल काही बंद झाले नाही. कॅास्ट रिकव्हर झाली असेल तर टोल बंद झाले पाहिजे. पण मेंटेनस्ट जर सरकारला परवडत नसेल तर त्यांनी टोल कमी केले पाहिजे.
मुंबई : 8 ऑक्टोबर 2023 | निवडणुक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून घेतले जात आहें. त्यामुळे उद्या ते ऐकून घेतले जाईल. सर्वोच्च न्यायालयात उद्या प्रकरण येतील का? हे पहावे लागेल. आमच्या याचिकेवर लवकर निर्णय घ्या अशी आमची मागणी आहे. त्याबद्दल कॅवेट दाखल करण्याचे कारण नाही. निवडणुक चिन्ह धुंडाळण्याचे कुठलेही काम आमच्याकडे सुरु नाही. पक्ष आणि चिन्ह आमचे आहे. त्यामुळे आम्ही असा कुठलाही विचार करत नाही. निवडणुक आयोगाने वेळ घ्यावा. सर्व प्रतिज्ञापत्र तपासावे. त्यांनी वेळ घ्यावा. त्यांना यंत्रणा कमी पडत असले तर तपासणी करण्यात आम्ही मदत करू. पण त्यांनी वेळ घेऊन सर्व गोष्टी तपासाव्या असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. काही आमदारांनी दोन्ही गडाकडे प्रतिज्ञापत्र दिले आहे पण त्याला फार महत्व नाहीं असेही ते म्हणाले.