Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवर अखेर निर्णय आला; सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती हटवली
तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता 3 वर्षांनंतर आता 12 विधान परिषदेच्या आमदारांच्या नियुक्तीवर ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
मुंबई : तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न भीजत पडला होता. तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता 3 वर्षांनंतर आता 12 विधान परिषदेच्या आमदारांच्या नियुक्तीवर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयालयाने यावर घातलेली स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता लवकरच 12 विधान परिषदेच्या आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 12 आमदार नियुक्तीचे पत्र दिले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील तसे नियुक्तीबाबत पत्र दिले होते. मात्र त्यावेळी याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण आता स्थगिती उठवण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून येत्या काळात पुन्हा राज्यपाल रमेश बैस यांना प्रस्ताव पाठविण्यात येण्याची शक्यता आहे.