Special Report : 40 आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे 12 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील

Special Report : 40 आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे 12 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील

| Updated on: Jul 18, 2022 | 11:24 PM

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार राज्यात निवडून आले होते. त्यावेळी एनडीएत असलेल्या शिवसेनेने भाजपासोबत एकत्र निवडणूक लढवली होती. आता शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर द्धव ठाकरेंकडे फक्त 6 खासदार उरले आहेत.

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवसनेचे तब्बल 12 खासदार(Shivsena MP) शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरेंकडे फक्त 6 खासदार उरले आहेत.

Published on: Jul 18, 2022 11:13 PM