Special Report | आदित्य ठाकरेंनतर तेजसही राजकारणात येणार ?
तेजस ठाकरेंचे शालेय शिक्षण माहिमधील बॉम्बे स्कॉटिश शाळेत झालं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतल्या जयहिंद कॉलेजमधून पूर्ण केलं. काही वर्षे शिक्षणासाठी ते परदेशातही होते. मात्र तेजस ठाकरेंचा आवडता विषय हा वन्यजीव वाईल्ड लाईफ आहे. त्यामुळंच ते आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांशी जोडलेत तसंच त्यांनी वन्यजीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजातीही शोधून काढल्यात
मुंबई : तेजस ठाकरे(Tejas Thackeray )…उद्धव ठाकरेंचे(Udhav Thackeray) दुसरे पूत्र…आणि आदित्य ठाकरेंचे( Aditya Thackeray) धाकटे भाऊ… आता याच, तेजस ठाकरेंना राजकारणात उतरवण्याची मागणी शिवसेनेतून सुरु झालीय. तेजस ठाकरेंना युवा सेनेचं प्रमुखपद देण्यात यावं,अशी मागणी युवा सेनेतून सुरु झालीय.
त्यामुळं तसं झालं तर, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख…आदित्य ठाकरे कार्यकारी अध्यक्ष आणि युवासेनेचे प्रमुख तेजस ठाकरे असतील विशेष म्हणजे तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री करण्यासाठी, वर्षभराआधीच मिलिंद नार्वेकरांनी सुरुवात केलीय. सामनात जाहिरात देऊन, त्यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या होत्या. ठाकरे कुटुंबीयांचे व्हिव्हियन रिचर्ड्स तेजस उद्धव ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वेस्ट इंडिजचे स्फोटक फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स, यांच्याशी नार्वेकरांनी तेजस ठाकरेंची तुलना केली होती.या जाहिरातीसोबतच नार्वेकरांनी आणखी एक ट्विट करुन तेजस ठाकरेंच्या स्वभावाची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे, तेजस ठाकरे माझ्यासारखाच कडक डोक्याचा आहे, असं स्वत: बाळासाहेबांनीही जाहीरपणे सांगितलं होतं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय राजकारणात आहेत. मात्र, तेजस ठाकरे अजून सक्रिय राजकारणात उतरलेले नाहीत. उद्धव ठाकरेंसोबतच्या काही सभा असो की, मग आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीतल्या प्रचारात ते याआधी दिसलेत.
तेजस ठाकरेंचे शालेय शिक्षण माहिमधील बॉम्बे स्कॉटिश शाळेत झालं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतल्या जयहिंद कॉलेजमधून पूर्ण केलं. काही वर्षे शिक्षणासाठी ते परदेशातही होते. मात्र तेजस ठाकरेंचा आवडता विषय हा वन्यजीव वाईल्ड लाईफ आहे. त्यामुळंच ते आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांशी जोडलेत तसंच त्यांनी वन्यजीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजातीही शोधून काढल्यात. नुकतंच 2 दिवसांआधी तेजस ठाकरेंनी कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीचं दर्शन घेतलं होतं. आणि शिवसेनेवर आलेले राजकीय विघ्न दूर करण्याची मनोकामना केली होती. सध्या शिवसेना अडचणीत झालीय..सेनेत उभी फूट पडल्यानं 40 आमजार आणि 12 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडलीय. त्यामुळं सध्या आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन, सभा घेत आहेत. त्यातच तेजस ठाकरे राजकारणात आले तर एक आक्रमक चेहरा शिवसेनेला मिळेल.
तेजस ठाकरेंकडे युवासेनेची धुरा दिली तर आदित्य ठाकरे सेनेसाठी आणखी वेळ देऊ शकतील. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसोबत मिळून तेजस ठाकरे शिवसेनेला उभारी देऊ शकतात ठाकरे कुटुंबाचा विचार केला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकारणात आहेतच…राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेही राजकारणात उतरलेत. आता उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेतच. पण आदित्य ठाकरे कार्यकारी अध्यक्ष आणि तेजस ठाकरे युवासेनेचे पक्षप्रमुख झाले. तर घराणेशाहीवरुन पुन्हा ठाकरेंवर आणखी टीका होऊ शकते. तेजस ठाकरे राजकारणात येतील, अशा चर्चा याआधीही होती. पण आता शिवसेना अडचणीत असताना तेजस ठाकरेंची एंट्री होणार, हे पाहणं महत्वाचं असेल.