मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर या कारणामुळे माजी महापौर यांनीही घेतली ती शपथ
उद्या ईडी कार्यालयात चौकशीला हजर रहाणार आहे. हा एक चौकशीचा भाग आहे. त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे. चौकशी यंत्रणात राजकारण घुसले आहे.
मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कोविड काळात बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीने चौकशी साठी समन्स बजावले आहे. यावरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात शीतयुद्ध सुरु झाले आहे. दोन्ही नेत्या एकमेकांवर टीका करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी उद्या ईडी कार्यालयात चौकशीला हजर रहाणार आहे. हा एक चौकशीचा भाग आहे. त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे. चौकशी यंत्रणात राजकारण घुसले आहे. मुंबईकरांसाठी आम्ही चांगलं काम केलं आहे. हिशोब तर सर्वांना द्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन मी काहीही चुकीचे काम केलेलं नाही असे त्या म्हणाल्या. शीतल म्हात्रे ही भान हरपलेली बाई आहे. सत्य काय आहे ते बघावं असा टोला लगावला. तर, उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून आम्हाला नेहमी पाठिंबा दिलाय असे सांगितले.