‘पवार यांनी आणखी एक पुस्तक लिहावं, लोक माझे का पांगती?’; सदाभाऊ खोत यांची पुन्हा टीका
खोत यांनी आता पुन्हा एकदा पवार यांच्यावर टीका करताना, त्यांनी लोकांची घर फोडली असा घणागात केला आहे. पवार यांनी, वसंतदादा पाटील, राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण यांना फसवलं. तर याबाबतीत पवार यांचा इतिहास फार मोठा असून त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व चळवळी मोडून काढल्या असा आरोप खोत यांनी केला आहे.
सांगली : रयत क्रांती संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यांनी पवार यांचा सैतान असा उल्लेख केला होता. त्यानंतर खोत यांनी आता पुन्हा एकदा पवार यांच्यावर टीका करताना, त्यांनी लोकांची घर फोडली असा घणागात केला आहे. पवार यांनी, वसंतदादा पाटील, राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण यांना फसवलं. तर याबाबतीत पवार यांचा इतिहास फार मोठा असून त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व चळवळी मोडून काढल्या असा आरोप खोत यांनी केला आहे. तर पवार यांच्या राजकारणात किती माणसे गायब झाली होती त्याचा पत्ताच नाही. पवार यांनी काय काय घेतले याची फार मोठी यादी आफल्याकडे आहे, वेळ आली की ती सांगू असा इशाराही खोत यांनी दिला आहे. तर लोक माझ्या संगती हे पुस्तक फार सुंदर आहे मी वाचला आहे. पण आता त्यांनी नवीन पुस्तक लिहावं लोक माझे का पांगती? असेही टीका खोत यांनी पवार यांच्यावर केली आहे.