Raigad Irshalwadi Landslide | इर्शालगड दुर्घटना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडकडे रवाना; घेणार परिस्थितीचा आढावा
याचदरम्यान रायगडमध्ये मोठी दुर्घटना झाली असून महाडमधील तळीये आणि आंबेगाव तालुक्यातील माळीण या दुर्घटनांच्या कटू आठवणी ताजा झाल्या आहेत. येथील खालापूरच्या इर्शालगडावरील मोरबे धरणाच्या वरच्या भागात असणाऱ्या आदिवासींच्या वाडीवर काळाचा घाला पडला आहे.
रायगड, 20 जुलै 2023 | रायगडमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे होत असून सगळीकडे दाणादान उडालेली आहे. याचदरम्यान रायगडमध्ये मोठी दुर्घटना झाली असून महाडमधील तळीये आणि आंबेगाव तालुक्यातील माळीण या दुर्घटनांच्या कटू आठवणी ताजा झाल्या आहेत. येथील खालापूरच्या इर्शालगडावरील मोरबे धरणाच्या वरच्या भागात असणाऱ्या आदिवासींच्या वाडीवर काळाचा घाला पडला आहे. येथे दरड कोसळ्याल्याने २०० नागरिक आडकल्याचे समोर येत आहे. तर याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम मदत कार्य आणि बचावकार्य करत आहे. तर आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून बचावकार्यातील जवानाचा देखील मृत्यू झाला आहे. ही घटना मोठी असून याची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेच रायगडला निघाले आहेत. तर त्यांच्याआधी मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि वचाव कार्याचा आढावा घेतला आहे. तर मुख्यमंत्री शिंदे हे रायगडला जात असून ते रायगड जिल्हाधिकारी यांच्या सतत संपर्कात असून ते फोनवर घटनेचा आढावा घेत आहेत. तर अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून 8108195554 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.