‘कलंका’वरून राजकारण पेलटं; उद्धव ठाकरे यांनी पुन्हा डिवचलं फडणवीस आणि भाजपला
राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत फडणवीस यांच्यावर टीका करताना नागपूरला कलंक आहेत, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजप आक्रमक झाला आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेनं नवा वाद उफाळला आहे. राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत फडणवीस यांच्यावर टीका करताना नागपूरला कलंक आहेत, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजप आक्रमक झाला आहे. तर भाजपच्या कार्यर्त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने करत ठाकरे यांचा पुतळा जाळला आहे. तर पोस्टरला काळं फासलं आहे. यानंतर आता ठाकरे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत फडणवीस यांना डिवचतं त्यांनी अजित पवार यांच्यावर आरोप करताना, आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसण्यासाठी जेलमध्ये जातील असं म्हटलं होतं. तर तो केलेला आरोप कलंक नाही का? असा सवाल केला आहे. त्याचबरोबर फडणवीस यांना मी एक शब्द बोललो तर इतका लागला. पण तुम्ही संपुर्ण खानदानच उद्धवस्त करता असा टोला लगावला आहे.