पडळकर तुम्हाला नाशकात पाय ठेऊ देणार नाही; पवारांवर टीका केल्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

पडळकर तुम्हाला नाशकात पाय ठेऊ देणार नाही; पवारांवर टीका केल्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

| Updated on: Jan 11, 2023 | 1:09 PM

आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर करताना, शरद पवार यांनी ५० वर्षे राज्य केलं. पण, विकास केला नाही, असा आरोप केला होता.

नाशिक : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी पडळकर यांनी बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात, असे म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

पडळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर करताना, शरद पवार यांनी ५० वर्षे राज्य केलं. पण, विकास केला नाही, असा आरोप केला होता. तसेच शरद पवार हे जाणता राजा नाही, तर नेमता राजा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

पडळकरांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. तसेच पडळकर यांना यापुढे नाशिकमध्ये पाय देखील ठेवू देणार नाही, असा गर्भीत इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक अध्यक्षा अनिता भामरे यांनी दिलाय.

Published on: Jan 11, 2023 01:09 PM