शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 18, 2022 | 11:15 AM

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीच्या नेत्याकडून करण्यात आला आहे.

मुंबई :  शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.  रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीत वर्तृळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी सोमवारी भाजपच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णयावर देखील टीका केली होती. हा निर्णय आधीच घेतला असता तर महाराष्ट्राची पंरपरा जपली गेली असती असं रोहित पवार यांनी म्हटलं.

 

Published on: Oct 18, 2022 11:12 AM