‘बँक खाती तपासा, तसं समोर न आल्यास माफी मागा’; बारसू प्रकल्प विरोधक आक्रमक, फडणवीस यांच्यावर टीका

‘बँक खाती तपासा, तसं समोर न आल्यास माफी मागा’; बारसू प्रकल्प विरोधक आक्रमक, फडणवीस यांच्यावर टीका

| Updated on: Aug 06, 2023 | 8:04 AM

तर याचप्रकल्पावरून “तुम्ही जर बारसू प्रकल्प विरोधकांची बँक खाती तपासली तर त्यातील काही हे बंगळुरूला जात असल्याचे लक्षात येईल. बेंगळुरूहून त्यांच्या (बँक) खात्यात पैसे येतात.” असा दावा फडणवीस यांनी केला.

परभणी, 06 ऑगस्ट 2013 | रत्नागिरी जिल्‍ह्यातील बारसू रिफायनरीच्‍या विरोधात आता मोठी लढाई सुरू होण्याची शक्यता आहे. याच्याआधी याच प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गट हा सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरला होता. तर याच प्रकल्पाला स्थानिकांनी देखील कडाडून विरोध केला आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकल्पावरून विरोधकांना खडे बोल सुनावले. तर याचप्रकल्पावरून “तुम्ही जर बारसू प्रकल्प विरोधकांची बँक खाती तपासली तर त्यातील काही हे बंगळुरूला जात असल्याचे लक्षात येईल. बेंगळुरूहून त्यांच्या (बँक) खात्यात पैसे येतात.” असा दावा फडणवीस यांनी केला. तसेच काही कार्यकर्ते हे ग्रीनग्रीस (पर्यावरण मोहीम संघटना) च्या माजी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा देखील केला. यावरून आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यानंतर आता बारसू प्रकल्प विरोधक आक्रमक झाले असून थेट फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तर फडणवीस यांनी ज्या लोकांची खाती तपासायची आहेत ती तपासावीत त्यातून ते सांगतात तसं काही समोर आलं नाही तर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Published on: Aug 06, 2023 08:04 AM