शरद पवार यांच्यावरील टिकेनंतर 'हा' पक्ष पुढे सरसावला, 'त्या' भाजप आमदाराला करणार महाराष्ट्रातून हद्दपार ?

शरद पवार यांच्यावरील टिकेनंतर ‘हा’ पक्ष पुढे सरसावला, ‘त्या’ भाजप आमदाराला करणार महाराष्ट्रातून हद्दपार ?

| Updated on: Feb 16, 2023 | 8:40 AM

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात असलेला सवतसुभा जगजाहीर आहे. पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी पडळकर सोडत नाहीत. धुळ्यात एका कार्यक्रमात पडळकर यांनी पुन्हा पवार यांच्यावर टीका केली.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात असलेला सवतसुभा जगजाहीर आहे. पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी पडळकर सोडत नाहीत. धुळ्यात एका कार्यक्रमात पडळकर यांनी पुन्हा पवार यांच्यावर टीका केली. मात्र, या टीकेला उत्तर देण्यासाठी आरपीआय खरात पक्ष पुढे सरसावला आहे. पडळकर यांच्या विधानाचाही निषेध करतानाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा थोडा अभ्यास करा असा सल्ला आरपीआयचे सचिन खरात यांनी दिला आहे. शरद पवार यांनी मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करून बहुजन समाजाला न्याय दिला. बहुजन समाजाला आरक्षण दिले. पडळकर यांनी त्यांच्या जिभेला लगाम दिला नाही तर बहुजन समाज त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करेल, असा इशारा खरात यांनी दिला आहे.

Published on: Feb 16, 2023 08:40 AM