अखेर कोल्हापूर पूर्वपदावर आलं; इंटरनेट सेवाही झाली सुरू

अखेर कोल्हापूर पूर्वपदावर आलं; इंटरनेट सेवाही झाली सुरू

| Updated on: Jun 09, 2023 | 11:50 AM

दोन दिवस दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरासह इचलकंरजीमध्ये टिपू सुलतान आणि औरंगजेबाच्या फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवरून वाद चिघळला होता. मोठा राडा झाल्यानंतर कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकंरजी आणि कोल्हापूर शपहरासह काही ठिकाणी झालेल्या राड्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दोन दिवस दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरासह इचलकंरजीमध्ये टिपू सुलतान आणि औरंगजेबाच्या फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवरून वाद चिघळला होता. मोठा राडा झाल्यानंतर कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे तब्बल 42 तासांनंतर आता इंटरनेट सेवाही पूर्ववत करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनाला कोल्हापूर शहरात व्हॉट्सअॅप स्टेटसवरून मोठा राडा झाला होता. तर त्यावेळी पोलीसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. तर अफवा पसरु नये आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले होते. पण आता आता इंटरनेट सेवा सुरु झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Published on: Jun 09, 2023 11:50 AM