उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ बोचरी टीकेवर भाजप कार्यकर्ते भडकले; आक्रमक होत फोडले ठाकरे यांचे पोस्टर
यावेळी त्यांनी त्यांच्या या दौऱ्यात काही कार्यकर्ते मेळावे घेतले. ज्यात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या सत्ताप्रवेशावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
नागपूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या या दौऱ्यात काही कार्यकर्ते मेळावे घेतले. ज्यात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या सत्ताप्रवेशावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांचा ना, ना, ना म्हणजे हा, हा, हा असल्याचे म्हणत ते नागपूरचे कलंक असल्याची टीका केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी विमानतळ परिसरात लागलेले ठाकरे यांचे पोस्टर फाडले. तसेच अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांच्याबद्दल बोलायचा काहीही अधिकार नाही, असा एल्गार देखील यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.
Published on: Jul 11, 2023 10:46 AM
Latest Videos