Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदांता प्रकल्पानंतर उद्योगमंत्री उदय सामंत गुजरात दौऱ्यावर जाण्याचं कारण काय?

वेदांता प्रकल्पानंतर उद्योगमंत्री उदय सामंत गुजरात दौऱ्यावर जाण्याचं कारण काय?

| Updated on: Sep 26, 2022 | 12:57 PM

वेदांता प्रकल्पावरुन राजकारण तापलंय, अशातच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या गुजरात दौऱ्याचा अजेंडा काय? यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे एकत्र गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. गुजरात (Gujrat) दौऱ्यावर सामंत आणि मुनगंटीवार हे गुजरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. त्यानंतर राजकारण तापलंय. महाराष्ट्रातील लाखो तरुणांना मिळणारा रोजगार यामुळे हिरावला गेल्याचा संतप्त सूर उमटला होता. त्यानंतर आता सामंत आणि मुनगंटीवार यांचा गुजरात दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. या दौऱ्यादरम्यान, गुजरातमध्ये कोणत्या नव्या योजना आहेत, याची माहिती राज्याचे मंत्री घेणार आहेत. तसंच महाराष्ट्रात चांगल्या योजना आणण्यासाठी आढावादेखील त्यांच्याकडून घेतला जाईल, असं सांगितलं जातंय. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी उचलेलं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जातंय. या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. गुजरात मॉडेलवर आधारीत असलेल्या काही योजना आता शिंदे-फडणवीस सरकारकडून येत्या काळात राबवल्या जातात का, हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री कार्यालय सचिव विकास खरगे यासह काही अधिकारीदेखील गुजरात दौऱ्यावर असणार आहेत.

Published on: Sep 26, 2022 12:57 PM