मातोश्री येथे विजयाची रॅली नेणारच, निवडून येणारच, हा विश्वास कुणाचा?
विधान परिषदेची नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. काँग्रेसला 'हात' दाखविणाऱ्या उमेदवाराला पराभूत करणारच असा विश्वास 'या' उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
धुळे : नाशिक ( NASHIK ) पदवीधर मतदार संघात एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे ( VANCHIT BAHUJAN AGHADI ) , अपक्ष सत्यजित तांबे ( SATYAJIT TAMBE ) आणि शुभांगी पाटील ( SHUBHANGI PATIL ) या तीन उमेदवारांची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे ( DR. SUDHIR TAMBE ) यांनी काँग्रेसला हात दाखवत मुलगा सत्यजित तांबे याच्यासाठी माघार घेतली.
डॉ. सुधीर तांबे यांच्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली. भाजपने या निवडणुकीत अर्ज न भरल्याने सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेने तांबे यांना धोबीपछाड देण्यासाठी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
उमेदवार शुभांगी पाटील या मतदारांशी संपर्क साधण्यासाठी धुळ्यात गेल्या असता तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी सामान्य मुलीवर विश्वास दाखविला. त्यांचा विश्वास साथ ठरविणार आणि विजयाची रॅली मातोश्रीवर नेणार असा विश्वास व्यक्त केला.