संयोगिताराजे प्रकरणानंतर स्वराज्य संघटना आक्रमक, काय केली मागणी?
VIDEO | संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्यासोबत काळाराम मंदिरात घडलेल्या प्रकारानंतर स्वराज्य संघटनेची आक्रमक भूमिका
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी रामनवमीच्या निमित्ताने एक पोस्ट केली होती. ही पोस्ट लिहीत असतांना संयोगीताराजे छत्रपती यांनी 10 फेब्रुवारीला घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख त्यामध्ये केल्यानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र म्हणण्यावरून झालेल्या वादावर संयोगिताराजे यांनी काळाराम मंदिरातील पुजाऱ्यावर आरोप केले होते. त्यावरून महंत सुधारीदास पुजारी यांनी पत्रकार परिषद घेत असं घडलंच नाही मात्र अवमान झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हंटलं होतं. यावरून आता स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान, नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरातील महतांनी माफी मागावी, अशी मागणी आता स्वराज्य संघटनेकडून करण्यात आली आहे. तर रामनवमी उत्सव काळाराम मंदिरात सुरू असल्याने काळाराम मंदिरात करण्यात येणार आंदोलन मागे घेण्यात आल्याचे स्वराज्य संघटनेचे मुख्य प्रवक्ते करण गायक यांनी सांगितले आहे.