‘आगलावे’ तुमचं ‘संतुलन’… शिवसेना आमदाराचा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल
खासदार संजय राऊत हे मातोश्रीचे एकनिष्ठ आहेत असे मला कधीच वाटले नाही. मातोश्रीचे राजकारण उध्वस्त करण्याची सुपारी घेतली त्यांनी घेतली आहे.
सांगोला : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळे आमदार गेले म्हटल्यावर मुंबईत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आमदार आपल्यासोबत नाहीत अशी त्यांची भावना झाली. पण, त्यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे कायदेशीर लढाई जिंकली असा दावा शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. खासदार संजय राऊत हे मातोश्रीचे एकनिष्ठ आहेत असे मला कधीच वाटले नाही. मातोश्रीचे राजकारण उध्वस्त करण्याची सुपारी घेतली त्यांनी घेतली आहे. समतोल आणि संतुलन गेलेला माणूस आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी उरलीसुरली सहानुभूतीही घालवून बसतील. बेभान झालेला संजय राऊत कधी कुणावर काय बोलेल याचा नेम राहिलेला नाही. राऊत यांचे आडनाव बदलण्याची वेळ आली आहे. त्यांचे नाव ‘आगलावे’ करा. तो महाराष्ट्रात आग लावत फिरत आहे, अशी टीकाही शहाजी बापू पाटील यांनी केली.
Published on: Feb 24, 2023 12:32 PM
Latest Videos