अग्निपथ आंदोलन भडकले; आंदोलनकरत्यांनी रेल्वेला लावली आग

| Updated on: Jun 16, 2022 | 3:41 PM

बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून विद्यार्थ्यांनी रेल्वेला आग लावली आहे. केंद्रसरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. या योजनेला विद्यार्थ्यांच्या तीव्र आक्षेप घेतला होता. बिहारमध्ये सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधाला गुरुवारी हिंसक […]

बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून विद्यार्थ्यांनी रेल्वेला आग लावली आहे. केंद्रसरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. या योजनेला विद्यार्थ्यांच्या तीव्र आक्षेप घेतला होता. बिहारमध्ये सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधाला गुरुवारी हिंसक वळण लागले. कैमूर जिल्ह्यातील भाबुआ रोड रेल्वे स्थानकावर संतप्त आंदोलकांनी इंटरसिटी ट्रेनची बोगी पेटवून दिली. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही. आंदोलकांनी आरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म 4 ची तोडफोड केली. येथील स्टेशनवरील दुकानांमधूनही माल लुटण्यात आला. छपरा येथील रेल्वे स्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या रेल्वेच्या बोगीला आग लागली. शहरात अनेक ठिकाणी बस आणि बाजारपेठांची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Jun 16, 2022 03:40 PM