गुलाल आजही पडणार! 88 पैकी 78 मतमोजनी शिल्लक, आज कळणार कोण मारणार बाजी
29 एप्रिल रोजी मतमोजणी झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय.
मुंबई : ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकींचा धुराळा उडाला आहे. तर याच्याआधीच 18 ठिकाणी बिनविरोध निवडणुका (Elections) झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 235 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकींचा निकाल हाती येत आहेत. त्यापैकी राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. त्यापैकी 95 बाजार समित्यांची (market committees) 29 एप्रिल रोजी मतमोजणी झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. तर महाविकास आघाडीला मतदारांनी कौल दिल्याचे समोर येत आहे. तर आज 88 पैकी 78 बाजार समित्यांची मतमोजणी (Counting of Votes) आज होणार आहे. याकडेही संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या येणाऱ्या निकालात कोण बाजू मारणार हे आता पहावं लागणार आहे.