जिंकलो म्हणून फुलफूलन जायचं नसतं; नाना पटोलेंचा कोणाल टोला
शनिवारी लागलेल्या निकालावरून महाविकास आघाडीला चांगले यश मिळालं आहे. तर पक्ष म्हणून भाजप नंबर 1 राष्ट्रवादी नंबर 2 आणि काँग्रेस 3 नंबरचा पक्ष राहीला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा काही निकाल हाती आले.
भंडारा : राज्यातील रखडलेल्या अनेक निवडणुकांचा आता मार्ग मोकळा झाला असून त्याला सुरूवातही झाली. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रणधुमाळी काल शांत झाली. अनेक ठिकाणचे अंतिम निकाल काल हाती आले. शनिवारी लागलेल्या निकालावरून महाविकास आघाडीला चांगले यश मिळालं आहे. तर पक्ष म्हणून भाजप नंबर 1 राष्ट्रवादी नंबर 2 आणि काँग्रेस 3 नंबरचा पक्ष राहीला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा काही निकाल हाती आले. त्यातही महाविकास आघाडीला चांगले यश मिळालं. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जल्लोष करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांनी यश मिळालं म्हणून फुलफून जाणारे आम्ही नाही. तो आमचा मार्ग नाही. या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. तर भाजपला शेतकरी विरोधी धोरणांचा फटका बसल्याचे म्हटलं आहे. तर निकाल पाहिले ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रात आणि नागपुरात सर्वत्र अवकाळी पाऊस पडतो आहे यामध्ये अतोनात नुकसान झालंय सरकार झोपलेला आहे. सरकारने ज्या घोषणा विधानसभेत केल्या ती मदत अजूनपर्यंत झाली नाही असा घणाघात केला आहे.