कोल्हापूर बाजार समितीत मविआनं खातं उघडलं, 4 जाणांचा विजय; पहा कोणत्या गटातून झाले विजयी

कोल्हापूर बाजार समितीत मविआनं खातं उघडलं, 4 जाणांचा विजय; पहा कोणत्या गटातून झाले विजयी

| Updated on: Apr 30, 2023 | 11:47 AM

आज हाती आलेल्या निकालातही महाविकास आघाडीची सरशी दिसत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुंकीचा निकाल येत असून येथे ग्रामपंचायत गटातून मविआच्या 4 जाणांचा विजय झाला आहे.

कोल्हापूर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे (Agricultural Produce Market Committee) निकाल शनिवारी जाहीर झाले. शुक्रवारी 147 बाजार समित्यांसाठी चुरशीने मतदान झाले होते. तर आज आज 88 पैकी 78 बाजार समित्यांची मतमोजणी (Counting of Votes) आज होणार आहे. याकडेही संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या येणाऱ्या निकालात कोण बाजू मारणार हे आता पहावं लागणार आहे. याचदरम्यान काल आलेल्या निकालात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली होती. त्याप्रपमाणे आज हाती आलेल्या निकालातही महाविकास आघाडीची सरशी दिसत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुंकीचा निकाल येत असून येथे ग्रामपंचायत गटातून मविआच्या 4 जाणांचा विजय झाला आहे. बाजार समित्यांच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात होते. तर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, शिंदे गट विरोधात सर्वपक्षीय बंडखोर, भाजप, शिंदे गट अशी लढत होत आहे. तसेच हमाल गटातून अपक्ष उमेदवार आणि माजी संचालक बाबुराव खोत विजयी झाले आहेत.

आत्तापर्यंत लागलेले निकाल 

  • सत्ताधारी गट – 5
  • विरोधी – 1
  • अपक्ष – 1
Published on: Apr 30, 2023 11:47 AM