पुणे, अहमदनगर पाठोपाठात आता ‘या’ बाजार समितीच्या मतदानात राडा
कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी येथील मराठी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानावेळी ही बाचाबाची झाली आहे. तर येथे बोगस मतदान होत असल्याचा आरोप मतदार आणि उमेदवारांनी केला असून त्यामुळे बाचाबाची झाली.
जळगाव : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी आज मतदान होत असून चुरस पहायला मिळत आहे. मात्र याच बरोबर अनेक ठिकाणी बाचाबाची, राडा आणि गोंधळ झाल्याचे समोर येत आहे. अशीच बाचाबाची जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी येथील मराठी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानावेळी ही बाचाबाची झाली आहे. तर येथे बोगस मतदान होत असल्याचा आरोप मतदार आणि उमेदवारांनी केला असून त्यामुळे बाचाबाची झाली. यावेळी पोलीस आणि मतदारांमध्ये मोठी बाचाबाची देखील झालेली पाहायला मिळाली. राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. 253 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर इतर ठिकाणी थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात झाली आहे.
Published on: Apr 28, 2023 10:06 AM
Latest Videos