आमच्या विजयाने पक्षातून हकालपट्टी करणाऱ्यांना उत्तर मिळालं; राष्ट्रवादी बंडखोर नेते दांगट यांचा कोणाला टोला

आमच्या विजयाने पक्षातून हकालपट्टी करणाऱ्यांना उत्तर मिळालं; राष्ट्रवादी बंडखोर नेते दांगट यांचा कोणाला टोला

| Updated on: Apr 30, 2023 | 9:00 AM

राष्ट्रवादी बंडखोर नेते विकास दांगट यांनी भाजपशी हात मिळवणी करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अजित पवार यांनाच आव्हान निर्माण केलं आहे. यावेळी दांगट आणि भाजपाच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळविण्यात यश आले आहे.

पुणे : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकींचा निकाल हाती आले आहेत. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल आले आहेत. त्यात मात्तबारांना धक्का देण्यात स्थानिक आघाडींना यश आले आहे. यात हवेली बाजार समिती चर्चेत राहिली. हवेली तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी अनेक वेळा मेळावे आणि बैठकादेखील घेतल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल अगदी सहज निवडून येईल असे वाटत होतं. मात्र राष्ट्रवादी बंडखोर नेते विकास दांगट यांनी भाजपशी हात मिळवणी करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अजित पवार यांनाच आव्हान निर्माण केलं आहे. यावेळी दांगट आणि भाजपाच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळविण्यात यश आले आहे. यावरून दांगट यांनी भाजपशी हात मिळवणीवर बोलताना, शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे सहकारात पक्ष नसतो. स्थानिक विकास बघायचा असतो. तेच केलं. त्यामुळे आधी तालुकानंतर पक्ष. माझ्यावर कारवाई करणार्‍यांना हवेली तालुका समजून घेण्यास दहा जन्म घ्यावे लागतील, आमच्या विजयाने उत्तर मिळालं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विकास दांगट यांनी टोला लगावला.

Published on: Apr 30, 2023 09:00 AM