मुश्रीफ-घाटगे संघर्ष; कारण फक्त एकच बाजार समिती! काय होणार याची कागलकरांना धाकधूक
याच्याआधीचा इतिहास पाहिला असता बाजार समितीही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र यावेळी बाजार समितीच्या सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, ठाकरे गट विरोधात सर्वपक्षीय बंडखोर, भाजप, शिंदे गट अशी लढत होत आहे.
कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 70 केंद्रांवर चुरशीने 92.33% मतदान झाले. त्याची आज मतमोजणी पार पडत आहे. राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व शिवशाही शेतकरी विकास परिवर्तन आघाडी या दोन पॅनेलमध्ये निवडणुकीमध्ये बजरदस्त झुंझ पहायला मिळाली. तर अख्खे राजकारण कागलकडे वळालं यामुळे येणाऱ्या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र याच्याआधीचा इतिहास पाहिला असता बाजार समितीही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र यावेळी बाजार समितीच्या सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, ठाकरे गट विरोधात सर्वपक्षीय बंडखोर, भाजप, शिंदे गट अशी लढत होत आहे. सर्वपक्षीय बंडखोर, भाजप, शिंदे गटाची मोठ बांधण्यात समरजितसिंह घाटगे यांची तर आमदार हसन मुश्रीफ हे सत्ताधारी सत्ताधारी गटाचे असल्याने कोण जिंकणार हे पाहिलं जात आहे. आता मतमोजणी रमणमळा शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये 36 टेबलवर सुरू असून दुपारपर्यंत कल हाती येतील.