आगामी निवडणुकीत जनता शिंदेगटाचा करेक्ट कार्यक्रम करणार; संजय राऊतांचा निशाणा
दरम्यान, या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. राऊत यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.
मुंबई : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. आता निकाल येत असून जिंकणाऱ्यांवर गुलाल पडत असून फटाक्यांची आतिशबाजी होत आहे. राज्यातील आज वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 147 बाजार समित्यांचे मतदान आज पार पडले असून आज 88 बाजार समित्यांचे मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवेसेनेला (शिंदे गट) धक्का बसला आहे. दरम्यान, या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. राऊत यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. त्यांनी, बाजार समित्यांमध्ये गद्दार आमदारांचा करेक्ट कार्यक्रम झाला असं म्हटलेलं आहे. राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर हा निशाणा साधलाय. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी खोटे लाथाडले. त्यामुळे हिम्मत असेल तर आता महापालिका निवडणुका घेऊन दाखवा असा आव्हान राऊत शिंदे-फडणवीस सरकारला दिलं आहे. बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेसह महाविकास आघाडीला उत्तम यश मिळालं. गद्दार आमदारांचं शेतकरी मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केला. हेच महाराष्ट्राचा जनमानसा आहे. ही तर सुरुवात आहे. महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकींमध्ये असाच जोरदार कार्यक्रम होईल असं राऊत म्हणालेत.