‘…आता बियाणं निर्मिती कंपन्यांनी काळजी घ्यावी अन्यथा’, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा इशारा
बोगस बियाणे असेल बियाण्याची साठवणूक असेल चढ्या दराने माल विकत असतील तर ते खवपुन घेतले जाणार नाही असं म्हटलं आहे. तर मी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही, नियमानुसार पथके तयार केली आणि रेड टाकल्या असं स्पष्टीकरण दिलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे कृषी पथकांच्या छापेमारीवरून अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. याचदरम्यान त्यांनी याच्याआधी कृषी विभागाच्या कथित पथकात स्वीय सहाय्यक दीपक गवळी हे दिसत होते. मात्र तो आपला स्वीय सहाय्यक नसल्याची सत्तारांनी माहिती दिली.
त्यानंतर आता हे प्रकरण चांगलेच तापलेलं असतानाच सत्तार यांनी आता थेट बियाणं निर्मिती कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी याच्या आधी व्यापाऱ्यांवर कारवाई करताना, शेतकऱ्यांचे रक्त पेणाऱ्या व्यापाऱ्यांची बाजू घेऊ नका. बोगस बियाणे असेल बियाण्याची साठवणूक असेल चढ्या दराने माल विकत असतील तर ते खवपुन घेतले जाणार नाही असं म्हटलं आहे. तर मी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही, नियमानुसार पथके तयार केली आणि रेड टाकल्या असं स्पष्टीकरण दिलं आहे.
त्यानंतर आता ज्या कंपन्या या पेरणीसाठी बियानं पुरवातात त्यांनाही कृषिमंत्र्यांनी थेट इशारा दिला आहे. त्यांनी बी पुरवताय पण ते जर उगवलं नाही तर कंपन्याना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल असं म्हटलं आहे. त्यामुळे आता तसं होणार का हे पहावं लागणार आहे. तर बोगस बियाणं विक्री करणाऱ्या 5 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती देखील माहिती कृषिमंत्री सत्तार यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांना तक्रार करता यावी यासाठी आम्ही टोल फ्री नंबर दिला आहे. 18002334000 या नंबरवर कॉल करा आम्ही तातडीने कारवाई करू असेही आवाहन त्यांनी केलं आहे.