आरोपांचे सत्र! आता पूर्णा नदी घोटाळ्याचा सरपंचाचा सत्तार यांच्यावर आरोप; काय आहे नेमकं प्रकरण
त्यांच्यावर आधी टीईटी घोटाळा, कृषी विभागाच्या धाडींनंतर तब्बल 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता एका नव्या प्रकरणात सत्तार यांच नाव समोर आलं आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गेल्या वर्षभरात अनेक आरोप आणि घोटाळे केल्याची टीका होत आहे. त्यांच्यावर आधी टीईटी घोटाळा, कृषी विभागाच्या धाडींनंतर तब्बल 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता एका नव्या प्रकरणात सत्तार यांच नाव समोर आलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट पूर्णा नदीच पोखरल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याबाबत कोर्टा नांद्रा ग्रामपंचायत माजी सरपंच संजय निकम यांनी विभागीय आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार कोर्टा गावातील पूर्णा नदीतून 5000 ब्रास वाळू उचलण्याचं टेंडर सिल्लोड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने निघालं होतं. मात्र, या ठिकाणी 5000 ब्रास ऐवजी 1 लाख ब्रास वाळू उपसा करण्यात आली. तर ही बेसुमार वाळू अब्दुल सत्तार यांच्या मेडिकल कॉलेजसाठी उपसा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर वाळू उपसताना 10 ते 10 फुट खोस खड्डे येथे करण्यात आले आहेत. तर पूर्णा नदीची अक्षरशः चाळणी करण्यात आल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.