बच्चू कडू यांची मोठी घोषणा; मुख्यमंत्री शिंदे यांची अडचण? थेट मंत्रिपदाबाबत घेतला मोठा निर्णय
राज्यातील भाजपच्या युतीत असणाऱ्या रासप पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह प्रहार संघटनेचे नेते अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आप आपल्या नाराजी व्यक्त केल्या होत्या.
नवी दिल्ली, 18 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि मंत्रीपदावरून शिंदे गटासह भाजपमध्ये नाराजी दिसून आली आहे. तर राज्यातील भाजपच्या मित्र पक्षात देखील अशीच नाराजी समोर आली आहे. राज्यातील भाजपच्या युतीत असणाऱ्या रासप पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह प्रहार संघटनेचे नेते अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आप आपल्या नाराजी व्यक्त केल्या आहेत. मात्र आताही झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जानकर, खोत किंवा कडू यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरूनही कडू यांनी आपली नाराजी थेट माध्यमांतून मांडली होती. तर मंत्रीपदाबाबत आपण आपली भूमिका स्पष्ट करू अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मोठी घोषणा केली. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीच्या आधी कडू यांनी आपली भूमिका मांडताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काल बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री सध्या अडचणीत असल्याचे जाणवले आहे. त्यामुळे मी मंत्रीपदाचा दावा सोडला असून मला दिव्यांग खाते दिले म्हणून मी मंत्रीपदाचा दावा सोडतोय.