कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अहमदनगर सज्ज, वीकेंड लॉकडाऊन लागू, नवी नियमावली काय?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अहमदनगर सज्ज, वीकेंड लॉकडाऊन लागू, नवी नियमावली काय?

| Updated on: Jun 27, 2021 | 9:37 AM

अहमदनगरमध्ये उद्यापासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ही नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.

अहमदनगरमध्ये उद्यापासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ही नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. नुकतंच अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.(Ahmednagar District Administration order to new restriction  due to corona pandemic third wave)

अहमदनगरमध्ये शनिवारी आणि रविवार मेडिकल दुकान वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तर इतर दिवशी सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहतील. मात्र यासाठी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय नगरमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू केली जाणार आहे. तर त्या आधी दिवसभर जमावबंदी लागू असेल.