सातवा वेतन लागू करा; अहमदनगर पालिका कर्मचाऱ्यांची मागणी
अहमदनगरला (Ahmadnagar) महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार 28 फेब्रुवारीपासून (February) बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
अहमदनगरला (Ahmadnagar) महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार 28 फेब्रुवारीपासून (February) बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. या संदर्भात अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी आयुक्तांना नोटीस बजावली आहे. सातव्या वेतन (7 th Pay) आयोगाच्या शिफारशी मनपा कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी शासन मान्यता मिळवावी, मनपातील 305 आणि 505 कोर्ट कर्मचाऱ्यांतील सफाई कामगारांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसाहकाने महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता घ्यावी, तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, यासह प्रमुख मागण्या कामगार संघटनेकडून करण्यात आल्या आहे.
Published on: Feb 22, 2022 01:28 PM
Latest Videos