मुख्यमंत्री शिंदे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
CM Ekanth Shinde Visit Ahmednagar : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. वनकुटे गावातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं आणि घराचं मोठं नुकसान झालंय. पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. या गावात कांदा पिकांचे मोठं नुकसान झालंय. कांदा पिक मातीमोल झाल्याचं पाहायला मिळते आणि शंभर शंभर वर्ष जुनी असलेली जी झाडं आहेत ती उन्मळून पडली आहेत. थेट मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Published on: Apr 11, 2023 11:33 AM
Latest Videos