शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल
विविध मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर, शेतकऱ्यांच्या लॉंगमार्चची मुख्यमंत्र्यांकडून दखल; आज 'हे' तीन मंत्री आंदोलकांना भेटणार, पाहा व्हीडिओ...
धांदरफळ, अहमदनगर : विविध मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. अहमदनगरहून शेतकऱ्यांचा लॉंगमार्च निघाला. या लॉंगमार्चचा आज दुसरा दिवस आहे. शेतकरी नेते अजित नवलेही या मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. या लॉंगमार्चची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. आज राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात या भेटीत सविस्तर चर्चा होणार आहे. थोड्याच वेळात ही भेट होणार आहे. या भेटीनंतर आंदोलकांची पुढची भूमिका ठरवली जाणार आहे. भेटीनंतरही समाधान न झाल्यास शेतकऱ्यांचा लॉंगमार्च महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराकडे जाणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे.
Published on: Apr 27, 2023 08:20 AM
Latest Videos