Tv9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट: अवकाळीने नुकसान झालेल्या घराच्या बांधकामाला प्रशासनाकडून सुरुवात

Tv9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट: अवकाळीने नुकसान झालेल्या घराच्या बांधकामाला प्रशासनाकडून सुरुवात

| Updated on: Apr 12, 2023 | 10:18 AM

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली होती. त्याच्या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे, पाहा व्हीडिओ...

पारनेर, अहमदनगर : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली होती. हिरामण बन्सी बर्डे आणि कचरू विठ्ठल वाघ यांच्या घराची पडझड झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे घर त्वरित बांधून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाकडून दखल घेत पडझड झालेल्या घराच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे. पत्र्याचं शेड बांधून तयार तर दारात वाळू येऊन पडली. आज विटा येणार असून पक्क्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. वनकुटेमधील पडलेल्या घरांची अवस्था tv9 मराठीने दाखवली होती. Tv9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतोय.

Published on: Apr 12, 2023 10:18 AM