माझी बदनामी करण्यासाठी 'ती' पोस्ट व्हायरल; मोठं षडयंत्र रचलं जातंय; राधाकृष्ण विखे पाटील यांचे गंभीर आरोप

माझी बदनामी करण्यासाठी ‘ती’ पोस्ट व्हायरल; मोठं षडयंत्र रचलं जातंय; राधाकृष्ण विखे पाटील यांचे गंभीर आरोप

| Updated on: Apr 11, 2023 | 11:51 AM

Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतची एक पोस्ट काही दिवसांआधी व्हायरल झाली होती. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतची एक पोस्ट काही दिवसांआधी व्हायरल झाली होती. यात मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख होता. त्यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझी बदनामी करण्यासाठी माझ्याबाबतची मुख्यमंत्रिपदासंदर्भातलाी पोस्ट व्हायरल केली जात आहे. पोस्ट व्हायरल करण्यामागे मोठं षडयंत्र आहे. राज्याला एकनाथ शिंदे यांच्यासारखे भक्कम मुख्यमंत्री लाभले आहेत. त्यामुळे अशा व्हायरल पोस्टवर लोकांनी विश्वास ठेवू नये”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पारनेर तालुक्यात येत आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना लवकर लवकर मदत दिली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Published on: Apr 11, 2023 11:51 AM