“राष्ट्रवादी किती वेळा भावी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणणार, त्यापेक्षा लोकांची काम करा”
Ram Shinde on Jayant Patil : महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादी, जयंत पाटलांचं वक्तव्य; भाजप नेत्याचा घणाघात. पाहा व्हीडिओ...
अहमदनगर : भाजपचे नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “राष्ट्रवादी किती वेळा भावी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणणार. लोकांची काम करा. सत्तेत असताना कधी बोलत नाही. सत्ता असताना कधी भांडण करत नाही, असं राम शिंदे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीला वाटतं की आपल्यापासून लोक लांब चालले आहे. त्यामुळे ते भावी मुख्यमंत्री म्हणत आहे. तर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून 70 -75 च्या पुढे जागा त्यांच्या निवडून आल्या नाहीत. कदापि महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणं नाही हे पक्षाला कळून चुकलं आहे, असंही राम शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीची वज्रमुठ वगैरे काही नाही. ती सारखी-सारखी विस्कटते. त्यामुळे वज्रमुट राहतीये कुठे तर ओढून ताढून ही वज्रमुठ केली जाते. संजय राऊत यांच्या आरोपात आणि बोलण्यात कुठलंही तथ्य नसतं, असं राम शिंदे म्हणालेत.
Published on: Apr 30, 2023 03:54 PM
Latest Videos