1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; पाहा काय कारण?
Shirdi Bandh : 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थांचा CISF नियुक्तीला विरोध आहे. त्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. पाहा व्हीडिओ..
शिर्डी, अहमदनगर : 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थ हा बंद पाळणार आहेत. शिर्डी ग्रामस्थांचा CISF नियुक्तीला विरोध आहे. त्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. साई मंदिरात CISF सुरक्षा नियुक्त करू नये, अशी शिर्डीतील ग्रामस्थांची मागणी आहे. CISF सुरक्षेमुळे भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होणार असल्याचं शिर्डीकरांचं म्हणणं आहे.साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. अशात संस्थानकडे अगोदरच दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना केंद्रीय सुरक्षा का?, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे. CISF सुरक्षेला विरोधासह इतर काही मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत.
Published on: Apr 27, 2023 09:54 AM
Latest Videos