रोहित पवार यांच्या टीकेला राम शिंदे यांचं जशास तसं उत्तर; म्हणाले...

रोहित पवार यांच्या टीकेला राम शिंदे यांचं जशास तसं उत्तर; म्हणाले…

| Updated on: Mar 11, 2023 | 3:19 PM

Ram Shinde on Rohit Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित यांच्या टीकेला राम शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. पाहा...

अहमदनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या आणि बांधून पूर्ण झालेल्या पोलीस निवासस्थानाचे आपण उद्घाटन केल्यामुळे पोलिसांची प्रत्यक्ष राहण्याची सोय झाली याबद्दल आभार, असे पोस्टर रोहित पवार यांच्या वतीने नगरमध्ये लावण्यात आले. त्याला आता राम शिंदेंनी उत्तर दिलं आहे. “रोहित पवार यांचे वर्तन केव्हा सोशल मीडिया आणि पोस्टरबाजी करण्याचेच राहिले आहे. यापूर्वी शरद पवार कर्जत मध्ये आले तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यानी कधीही पोस्टरबाजी केली नाही. मात्र शरद पवार आल्यानंतर कर्जतमधील माता भगिनींनी पाणी पाणी मनात हांडे फोडले त्याची दखल तुम्ही घेतली नाही”, असं राम शिंदे म्हणालेत.

Published on: Mar 11, 2023 03:19 PM