अहमदनगरमध्ये समाजकंटकांकडून राडा; 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराज नगर येथे घडली. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे
अहमदनगर : काही दिवसांपुर्वीच रामनवमी दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात जोरदार राडा झाला होता. त्यांनमतर राज्यात पुन्हा असे राडे होताना दिसत आहेत. तर हे राडे समाजकंटकांकडून होत असून दंगल घडविण्यासाठीच हे केलं जात असल्याची टीका विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर केली जात आहे. यानंतर आता अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराज नगर येथे घडली. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. तर 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करत 10 ते 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या दगडफेकीत चार ते पाचजण जखमी झाले असून त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखण्यात यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.