रामनवमीच्या दिवशी मंत्री दीपक केसरकर साईंच्या चरणी; म्हणाले, प्रभू श्रीरामाची सेवा...

रामनवमीच्या दिवशी मंत्री दीपक केसरकर साईंच्या चरणी; म्हणाले, प्रभू श्रीरामाची सेवा…

| Updated on: Mar 30, 2023 | 10:12 AM

Deepak Kesarkar : रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज साईबाबांच दर्शन घेतलं. दर्शनानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणालेत? पाहा...

शिर्डी, अहमदनगर : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज साईबाबांचं दर्शन घेतलं. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईबाबांचं दर्शन घेतलं. यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “रामनवमीनिमित्त दर्शनासाठी आलोय. राज्यात जी आरिष्ठ आहेत, ती दूर होऊ दे अशी साईंचरणी प्रार्थना केली”, असं केसरकर म्हणाले आहेत. “कालच काष्टपुजनाचा कार्यक्रम पार पडला. गागाभटांनी छत्रपतींचा राज्याभिषेक केला होता. हे नात आणखी घट्ट व्हावं. जोडलं जावं. महाराष्ट्रातील सागवानी लाकुड अयोध्या येथील श्रीराम मंदिराला वापरलं जाणार आहे. प्रभू श्रीरामाची सेवा महाराष्ट्राकडून घडतेय. याचा आनंद आहे”, असंही केसरकर म्हणाले आहेत.