सत्तेची नशा कोणाला? नागपुरात अजित पवार यांच्या बॅनरवर काय झालं?
काही ठिकाणी यावर शदर पवार यांचा फोटो पहायला मिळत आहे तर काही ठिकाणी बॅनरवरून राष्ट्रवादीचं घड्याळ आणि सर्वेसर्वा शरद पवारांचा फोटो गायब झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यावरूनही आता राजकारण चांगलेच तापलेलं आहे.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा बारामती, आमदार अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात आणि अनेक जिल्ह्यात सध्या अजित पवार आणि त्यांच्या सहकारी नेत्यांचे मंत्री झाल्यावरून अभिनंदनाचे बॅनर लागत आहेत. मात्र काही ठिकाणी यावर शदर पवार यांचा फोटो पहायला मिळत आहे तर काही ठिकाणी बॅनरवरून राष्ट्रवादीचं घड्याळ आणि सर्वेसर्वा शरद पवारांचा फोटो गायब झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यावरूनही आता राजकारण चांगलेच तापलेलं आहे. नागपुरातही अजित पवार यांच्या बॅनरवरून शरद पवारांचा आणि घड्याळाचा फोटो गायब झाला आहे. तर त्यांच्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार गटाचे नेते प्रशांत पवार, सुनील फुंडे, राजेंद्र जैन यांनी ही बॅनर्स लावली आहेत.
Published on: Jul 05, 2023 10:43 AM
Latest Videos