...तर मी पवारांची औलाद नाही, 2019 च्या भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर अजित पवार यांचा गौप्यस्फोट

“…तर मी पवारांची औलाद नाही”, 2019 च्या भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर अजित पवार यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 05, 2023 | 4:19 PM

मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची पोलखोल केली आहे.

मुंबई: मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची पोलखोल केली आहे. ते म्हणाले की, “2017 काही वेगळं करण्याचा प्रयत्न झाला. त्याआधी 2014ला आम्ही सिल्व्हर ओकला होतो. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देऊ. आम्ही शांत बसलो. कारण नेत्याचा निर्णय होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं वानखेडेला शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर राहा. आम्ही गेलो. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले. त्यांनी आमची विचारपूस केली. भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला तिकडे का पाठवलं? शपथविधीला का पाठवलं? 2017ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. सुनील तटकरे, मी, जयंत पाटील होते. सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत तावडे हे लोक होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्रीपदं…मी कधीही खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद ठरणार नाही.त्यानंतर सुनील तटकरेंना दिल्लीला बोलावलं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि तटकरे यांची बैठक झाली. भाजपने सांगितलं शिवसेना आमचा 25 वर्ष जुना मित्र पक्ष आहे. आम्ही शिवसेनेला सोडणार नाही.”

 

Published on: Jul 05, 2023 04:19 PM