अजितदादांची इच्छा, विरोधी पक्षनेते पद नको; अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचंय का? पाहा स्पेशल रिपोर्ट…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत काल कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत काल कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि नेते प्रफुल्ल पटेल यांना कार्यध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संघटाना मोठी करायचं असल्याचं सांगून विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आता अजित पवार यांचं म्हणणं शरद पवार ऐकतात का? आणि त्यांना कोणती जबाबदारी देतात यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…