चर्चा तर होणारच! अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामनात जाहिरात

चर्चा तर होणारच! अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामनात जाहिरात

| Updated on: Jul 22, 2023 | 11:23 AM

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामनामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या समर्थकांडून सामनामध्ये शुभेच्छा देणारी जाहिरात देण्यात आली आहे.

मुंबई, 22 जुलै 2023 | राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यांच्या समर्थकांकडून जागोजागी बॅनर्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामनामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या समर्थकांडून सामनामध्ये शुभेच्छा देणारी जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Published on: Jul 22, 2023 11:23 AM