‘सामना’तील ‘रोखठोक’नंतर आता आंबेडकर यांचं सूचक विधान; याचा संबंध अजित पावार यांच्याशी?

‘सामना’तील ‘रोखठोक’नंतर आता आंबेडकर यांचं सूचक विधान; याचा संबंध अजित पावार यांच्याशी?

| Updated on: Apr 16, 2023 | 3:58 PM

कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण राष्ट्रवादी कुणासोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी भूमिका घेतल्याचेही ‘रोखठोक’मधून दावा करण्यात आला आहे

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये प्रवेश करणार, ते अस्वस्थ असल्याच्या बातम्या येत होत्या. याचदरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’तील आजच्या ‘रोखठोक’मधून पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात असल्याचा दावा केला आहे. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण राष्ट्रवादी कुणासोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी भूमिका घेतल्याचेही ‘रोखठोक’मधून दावा करण्यात आला आहे. यावरून अजित पवार हे भाजपमध्ये जाणार ही शक्यता गडद होताना दिसत आहे. याचदरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील असाच दावा करत राज्यात राजकीय खळबळ उडवून दिली आहे. आंबेडकर यांनी, राज्यात पुढच्या 15 दिवसात 2 मोठे राजकीय स्फोट होणार असे म्हटलं आहे. त्यांमुळे त्यांचाही इशारा हा अजित पवार यांच्याकडेच असल्याचा बोलले जात आहे.

Published on: Apr 16, 2023 03:54 PM