माझा मराठा आरक्षणाला पाठींबा, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न अजित पवार काय म्हणाले ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता रोहीत पवार यांच्या ईडी चौकशीबद्दल आपले सडेतोड मत व्यक्त केले आहे. अनेकांची आत्तापर्यंत चौकशी झाली आहे. अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात, आपली स्वत:ची पाच तास एसीबीने चौकशी केली होती. त्याचा एवढा प्रोपोगंडा किंवा इव्हेंट करायची काहीही गरज नसते असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी आपली भूमिका असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुणे | 26 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणा संदर्भात चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी सुरु आहे. सीएम साहेबांनी अधिकारी भांगे यांचे शिष्ठमंडळ चर्चेसाठी नवीमुंबईला पाठविले आहे. या चर्चेमधून काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. माझ्या गाडीला काळे झेंडे दाखविणारा उबाटाचा अध्यक्ष होता. लोकशाहीत प्रत्येकाला निदर्शने करायचा अधिकार आहे. पार्थ पवार याने गुंड गजा मारणे याची भेट घेतली हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. कार्यकर्ते त्यांना घेऊन गेले आणि एका घरात ही घटना घडली. याबाबत मी पार्थशी बोलणार आहे. राजकारणात काही वेळा कार्यकर्त्यामुळे अशा घटना अनेकांबाबत घडत असतात. प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी प्रत्येकाला माहीती नसते असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. मी पोलिस डिपार्टमेंटला अशा प्रवृत्तीची माणसे आमच्या बाजूला असतील तर सावध करा असे सांगितले असल्याचे ते म्हणाले. रोहीत पवार यांच्या चौकशीबद्दल ते म्हणाले की माझी एसीबीने पाच तास चौकशी केली होती.त्याचा इव्हेंट करायची गरज नसते असेही त्यांनी सांगितले.