Video | ‘मला ते करुन पाहिजे…’ अधिकाऱ्याला अजित पवारांनी सगळ्यांदेखत फोनवरुनच झापलं
उपमुख्यमंत्री हे त्यांच्या डॅशिंग कृतीमुळे अधिक चर्चेत असतात नुकतेच त्यांनी एका अधिका-याला काम का झाले नाही, तसेच ते का होत नाही असं सगळ्यांसमोर फोन लावून चांगलेचं झापल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्यात अनेक कार्यकर्त्यांची तक्रारी आल्याने अजित पवारांनी थेट अधिका-यांना सर्वांनसमोर फोन लावला.
मुंबई – उपमुख्यमंत्री हे त्यांच्या डॅशिंग कृतीमुळे अधिक चर्चेत असतात नुकतेच त्यांनी एका अधिका-याला काम का झाले नाही, तसेच ते का होत नाही असं सगळ्यांसमोर फोन लावून चांगलेचं झापल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्यात अनेक कार्यकर्त्यांची तक्रारी आल्याने अजित पवारांनी थेट अधिका-यांना सर्वांनसमोर फोन लावला. त्यावेळी त्यांनी त्या अधिका-याला जाब विचारल झापल्याची चर्चा आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तो स्टेटसला देखील ठेवला आहे. त्यामुळे अजित पवारांची पुन्हा एकदा पुण्यात चर्चा सुरू झाली. पुणे महापालिकेच्या तोंडावर अजित पवारांनी अनेक कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या समस्या देखील ते जाणून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 06, 2022 10:47 AM