मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार म्हणतात... तर 'ते' आमदार फुटणार; सरकारला भीती वाटते 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार म्हणतात… तर ‘ते’ आमदार फुटणार; सरकारला भीती वाटते 

| Updated on: Sep 15, 2022 | 2:21 PM

अजित पवार यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

जळगाव :  अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ते आज जळगावमध्ये बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तारावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला आहे. अडीच महिने मंत्रिमंडळात दोघेच काम करत होते. सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराची भीती वाटते. अनेकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले आहे. त्यांना जर मंत्रिपद मिळाले नाही तर ते फुटू शकतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी पालकमंत्रीपदावरून देखील निशाणा साधला आहे. जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यानं अनेक कामं रखडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तुम्ही तुमचे नवे निर्णय घ्या, मात्र जुन्या सरकारच्या निर्णयांंना स्थगिती का देता असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

 

 

 

 

Published on: Sep 15, 2022 02:21 PM