महिला कुस्तीपटू आंदोलनावरून अजित पवार यांचा केंद्राला सवाल? म्हणाले, 'चर्चा करून तोडगा का...?'

महिला कुस्तीपटू आंदोलनावरून अजित पवार यांचा केंद्राला सवाल? म्हणाले, ‘चर्चा करून तोडगा का…?’

| Updated on: May 31, 2023 | 2:08 PM

नव्या संसद भवनाचा उद्घाटना दिवशीच त्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याचं काम दिल्ली पोलीस करताना दिसले. याप्रकारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर भाष्य केलं. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक असल्याचं पवार यांनी ट्वीट करत म्हटलं होतं.

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी 23 एप्रिलपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहे. तर नव्या संसद भवनाचा उद्घाटना दिवशीच त्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याचं काम दिल्ली पोलीस करताना दिसले. याप्रकारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर भाष्य केलं. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक असल्याचं पवार यांनी ट्वीट करत म्हटलं होतं. त्यानंतर आता या विषयावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. तसेच त्या महिला कुस्तीपटूंची मागणी काय आहे हे जाणून घ्यायला हवं होतं. त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांच्या आरोपात काही तथ्य आहे का नाही हे तपासायला हवं होतं. मात्र तथ्य असेल तर निर्णय घ्या आणि नसेल तर त्या खेडाळूंची समजूत काढा. पण अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागलं जात आहे. संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर करूनही जर न्याय मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन केलं आहे. त्यांना हा शेवटचा मार्ग अवलंबला असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Published on: May 31, 2023 02:08 PM